R Ashwin and Ravindra JadejaX/BCCI
Cricket
IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव
Nathan Lyon Praise R Ashwin: भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाने भारताच्या आर अश्विनचे भरभरून कौतुक केले आहे.
India Tour of Australia: भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पण त्याआधी दोन्ही देशातील खेळाडू या मालिकेबाबत आपआपली मते व्यक्त करताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायन याने रवीचंद्रन अश्विनचे कौतुक केले आहे.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू बहुतांशी वेळा तुम्हाला प्रशिक्षकांप्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. अश्विन हा महान गोलंदाज आहे. संपूर्ण कारकीर्दीत माझी त्याच्यासोबत तुलना होत आहे. मात्र त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.

