
New Zealand bowler ruled out of Champions Trophy 2025 भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडने स्पर्धेपूर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या त्रिदेशीय मालिकेत २ सामने जिंकले. त्यामुळे भारताला न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. अशात शेवटच्या क्षणी न्यूझीलंड संघाला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सिअर्सला मांडीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.