
New Zealand Dominate India in ICC Knockout Matches: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडविरूद्ध भिडणार आहे. भारताने स्पर्धेतील अंतिम साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले होते. भारतीय संघ स्पर्धेतील सर्व सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहोचला आहे. तर न्यूझीलंडने स्पर्धेत एक सामाना (भारताविरूद्ध) गमावला आहे. भारतीय संघ यावेळी स्पर्धेत मजबूत स्थितीत असला, तरी ICC स्पर्धांमधील बाद फेरीतील सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे भारतावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे.