tim southee
tim southeeesakal

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Tim Southee Retirement : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Published on

Tim Southee Annouced Retirement From Tests Cricket: न्यूझीलंडचा माजी कसोटी कर्णधार व वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टीम साऊदी न्यूझीलंडसाठी दुसरा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २८ नोव्हेंबरनंतर सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर साऊदी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. १४ ने १८ डिंसेंबरदरम्यान होणारा मालिकेतील अंतिम सामना टीम साऊदीचा शेवटचा कसोटी सामना असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com