
NZ vs PAK T20 Series: पाकिस्तान यांच्यामध्ये १६ मार्चपासून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची निवड मंगळवारी करण्यात आली. न्यूझीलंडने पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभवाची धुळ चारली आहे. आधी तिरंगी लढतीत पाकिस्तानला हरवले आणि मग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सामन्यात नामुष्की केली. आता न्यूझीलंडने पाकिस्तानविरूद्धटच्या ट्वेंटी- २० मालिकेसाठी दुय्यम संघाची निवड केली आहे.
न्यूझीलंडचा संघ निवडताना यावर आयपीएलचा प्रभाव प्रकर्षाने दिसून आला. न्यूझीलंडचे बहुतांशी स्टार खेळाडू आयपीएलमधील विविध संघांमधून खेळत असल्यामुळे त्यांची निवड पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी करण्यात आलेली नाही.