IPL 2024 दरम्यानच 'हा' संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, असे आहे T20I मालिकेचे संपूर्ण शेड्युल

NZ vs PAK, T20I Series: आयपीएलचा 17 वा हंगाम मार्च ते मे दरम्यान खेळवला जाणार असून याचदरम्यान पाकिस्तानमध्ये टी20 मालिका खेळवली जाणार आहे.
New Zealand vs Pakistan
New Zealand vs PakistanX/ICC

New Zealand Tour of Pakistan : इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा (IPL) 22 मार्चपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा सुरु असतानाच न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड संघ या दौऱ्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 18 एप्रिलपासून सुरू होईल. जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे. हा वर्ल्डकप कॅरेबियन देशांत (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत होणार आहे.

New Zealand vs Pakistan
Rachin Ravindra: रचिनने जिंकला न्यूझीलंडचा सर्वात मोठा पुरस्कार, 'हा' पराक्रम करणारा सर्वात तरुण क्रिकेटर

दरम्यान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातीय या आगामी टी20 मालिकेतील तीन सामने रावळपिंडीला आणि दोन सामने लाहोरला होणार आहेत. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ 14 एप्रिलला पाकिस्तानमध्ये येईल. त्यानंतर 18 एप्रिलला पहिला सामना होईल. त्यानंतर 20, 21, 25 आणि 27 एप्रिल रोजी पुढील सामने होतील.

न्यूझीलंडचा गेल्या दीड वर्षातील हा तिसरा पाकिस्तान दौरा असणार आहे. न्यूझीलंडने डिसेंबर 2022-जानेवारी 2023 दरम्यान कसोटी आणि वनडे मालिका खेळली होती. त्याचबरोबर एप्रिलमध्येही न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये वनडे आणि टी२० मालिका खेळली होती.

New Zealand vs Pakistan
IPL 2024 : ऋषभ पंत आला मात्र... दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! संघाचा स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

आयपीएलमध्ये खेळणार न्यूझीलंडचे खेळाडू

दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात ही टी20 मालिका आयपीएलदरम्यान होणार असली, तरी आयपीएलमध्ये सहभागी असलेले न्यूझीलंडचे खेळाडू या टी20 मालिकेचा भाग नसण्याची शक्यता आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच त्यांचे खेळाडू संपूर्ण आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी उपलब्ध असणार असल्याचे सांगितले होते.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका

  • 18 एप्रिल - पहिला टी20 सामना, रावळपिंडी

  • 20 एप्रिल - दुसरा टी20 सामना, रावळपिंडी

  • 21 एप्रिल - तिसरा टी20 सामना, रावळपिंडी

  • 25 एप्रिल - चौथा टी20 सामना, लाहोर

  • 27 एप्रिल - पाचवा टी20 सामना, लाहोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com