
Nicholas Pooran Withdrew his Appeal Against Tom Curran : आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीग स्पर्धेत गल्फ जायंट्सविरूद्धच्या सामन्यात एमआय एमिरेट्सचा कर्णधार निकोलस पूरनला आपली अपील मागे घ्यावी लागली. स्पर्धेतील १९ वा सामना निर्णायक टप्प्यावर असताना निकोलस पूरनने टॉम करनला रन ऑऊट केले. तिसऱ्या पंचांनी देखील ऑऊट जाहीर केले. पण मैदानावर सर्वांच्या नाराजीमुळे पूरनला आपली अपील मागे घ्यावी लागली व मैदानाबाहेर गेलेल्या टॉम करनला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात बोलावण्यात आले.