

KKR New Captain For IPL 2025 : इंडियन प्रिमिअर लीगला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व फ्रॅंचायझींनी आपले कर्णधार जाहीर केले असून दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांनी अद्याप आपल्या संघाचा कर्णधार जाहीर केलेला नाही. गतविजेत्या केकेआर संघाने श्रेयस अय्यरला संघातून रिलीज केल्यानंतर केकेआरमध्ये कर्णधार पदाची जागा रिक्त आहे. भारताचा माजी कर्णधार व मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे कर्णधार पदाच्या शर्यतीत आहे. पण केकेआर अजिंक्य नाही तर दुसऱ्याच खेळाडूवर कर्णधारपदाचा डाव लावणार असल्याचे समजत आहे.