
Novak Djokovic Conversation With Daughter Viral Video : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने कार्लोस अल्काराजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. नोवाक जोकोविच ५० व्यांदा ग्रॅंडस्लॅम सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. सामना जिंकल्यानंतर पोस्ट मॅच मुलाखतीवेळी जोकोविचच्या मुलीने घड्याळाकडे बोट दाखवत, 'पप्पा उशीर होतोय' असा इशारा केला. त्यामुळे जोकोविच प्रश्नाच उत्तर न देता मुलीच्या इशाऱ्याची दखल घेतली. जोकोविचच्या या लेकीवरील प्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.