
New Zealand Defeated Pakistan in 2nd T20: पाकिस्तानला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे सामना १५ षटकांचा खेळवण्यात आला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ९ बाद १३५ धावा केल्या आणि न्यूझीलंडने घरच्या मैदानावर ७९ चेंडूत लक्ष्य गाठत दुसरा ट्वेंटी-२० सामनाही जिंकला. त्यामुळे आता ५ ट्वेंटी -२० सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने २-० ने आघाडी घेतली आहे.