PAK vs NZ Champions Trophy 2025esakal
Cricket
PAK vs NZ: डर का माहोल है! उद्घाटन सामन्यात फायटर प्लेन उडवले, पण खेळाडूंसह प्रेक्षक पण घाबरले; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग
PAK vs NZ Champions Trophy : पाकिस्तानमधील कराची मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील उद्घाटन सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरूवातील विनोदी किस्सा घडला, त्यामुळे पाकिस्तानला ट्रोल केले जात आहे.
PAK vs NZ Champions Trophy Video Viral: पाकिस्तानातील कराची मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उद्घाटन सामना यजमान पाकिस्तान व न्यूझीलंडदरम्यान रंगला आहे. पाकिस्तानने सामना नाणेफेक जिंकून घरच्या मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण सामन्याला सुरूवात होताना एक विनोदी किस्सा मैदानावर घडला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

