
Glenn Phillips Flying Catch Video Viral: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयसाठी ३२१ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारताना ग्लेन फिलिप्सने अर्धशतक ठोकत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण तगड्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ कुठेतरी अडखळताना दिसत आहे. अवघ्या २२ धावांवर पाकिस्तानने सुरूवातीचे दोन विकेट्स गमावले आहेत. ज्यामध्ये ग्लेन फिलिप्सने अविश्वसनिय झेल करत पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानला माघारी पाठवले.