
PAK vs NZ Champions Trophy 2025: न्यूझीलंडच्या सलामीवीराने पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी उद्घाटन सामन्यात दणदणीत शतक ठोकले. Champions Trophy 2025 स्पर्धेतील हे पहिले शतक ठोकले. सुरूवातीचे तीन विकेट्स स्वस्तात बाद झालेले असताना सलामीवीर विल यंग मैदानावर टीकून राहिला व शतक ठोकत न्यूझीलंडला सावरले. विल यंग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शतक करणारा चौथा न्यूझीलंडचा फलंदाज ठरला त्याचबरोबर टॉम लॅथमनेही सामन्यात अर्धशतकी खेळी केली.