pakistan vs West indies
pakistan vs West indiesesakal

PAK vs WI: पाकिस्तानला घरात घुसून हरवले; वेस्ट इंडिजने शेजाऱ्यांचे वाईट हाल केले, तब्बल ३४ वर्षांनी जिंकले

PAK vs WI 2nd Test: पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात पराभवाचा वचपा काढला व पाकिस्तानला हरवत मालिकेत बरोबरी साधली.
Published on

West Indies Won 2nd Test Against Pakistan : पाकिस्तानविरूद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजने जोरदार पुनरागमन केले आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानावर अनुभवाचा फायदा उचलत पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. पण वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकला आणि मालिका १-१ ने बरोबरी सुटली. मुल्तान येथे झालेला दुसरा कसोटी सामना वेस्ट इंडिजने १२० धावांनी जिंकला. या विजयासह विंडीजची ३४ वर्षांनी प्रतिक्षा संपली आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात विंडीजला आज यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com