
Pakistan at Last Position in WTC Point Table: पाकिस्तानने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरूद्ध खेळली. ही मालिका १-१ ने बरोबरीत सुटली, त्यामुळे पाकिस्तानला WTC क्रमवारीत शेवटचे स्थान मिळाले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या क्रमवारीत पाकिस्तान नवव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत आठव्या स्थानावर वेस्ट इंडिज, तर सातव्या स्थानावर बांगलादेश आहे.