

Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand head-to-head stats
कराची, ता. १८ : चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. गतविजेत्या पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या आयोजनाचा मान आहे आणि पहिल्याच सामन्यात त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणारा पाकिस्तानचा संघ अनिश्चिततेसाठी ओळखला जातो आणि ते त्यांचे जेतेपद राखण्यासाठी उत्सुक आहेत. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. हा गट अ चा पहिला सामना असेल आणि या गटात भारत व बांगलादेश यांचा समावेश आहे.