
Pakistani Audience Funny Video at Karachi Stadium : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आले आहे. यजमान पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जोरदार व जलद तयारी केली. तब्बल २८ वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी पाकिस्तान बोर्डाने कराची स्टेडियमची दुरूस्तीचे काम हाती घेतले व स्पर्धा तोंडावर आली असताना काम पूर्णत्वास नेले. या कराची मैदानाच्या उद्घाटन सोहळ्याला पाकिस्तानी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.