
Pakistani fans reaction after pakistan loose match against india : कालच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर जगभरातून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विशेषत: पाकिस्तानमध्ये कालच्या सामन्याचे जोरदार पडसाद उमटले. लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळेच पाकिस्तानी चाहते आपल्या संघावर बरसताना पाहायला मिळत आहेत. अशात दुबईमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याने संघावर जोरदार टीका केली व सर्व सत्यानाश झाल्याचे झाला म्हणत आपले दुख: व्यक्त केले. यावेळी त्याने पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानवर टीकास्र सोडले, तर शतकवीर विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले.