
Prajwal More Massive Knock In Vijay Merchant Trophy : विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र मध्य प्रदेशविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळत आहे. महाराष्ट्राने मध्य प्रदेशचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ३०० धावांचा टप्पा पार करत मध्य प्रदेशविरूद्ध मोठी आघाडी घेतली, ज्यामध्ये महाराष्ट्राचा विकेटकीपर फलंदाज प्रज्वल मोरेने दीडशतकी खेळी केली.