
नवी दिल्ली : शेफाली वर्माकडे आक्रमक फलंदाजीचा विशेष गुणवत्ता (एक्स फॅक्टर) असेल; परंतु कधी तरी चमकणाऱ्या अशा गुणवत्तेपेक्षा सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची असते, असे सांगत भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडू रीमा मल्होत्रा यांनी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शेफालीऐवजी प्रतीका रावळची करण्यात आलेली निवड योग्य ठरवली आहे.