

पुणे, ता. १४ : ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘४०+ पुणे क्रिकेट संस्था’ यांच्यातर्फे पुण्यात ऑल इंडिया ४०+ एससीएल (सीनियर क्रिकेट लीग) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४० वर्षांवरील अनुभवी क्रिकेटपटूंना एकाच व्यासपीठावर खेळण्याची संधी देणारी ही स्पर्धा यंदा अधिक भव्य स्वरूपात नोव्हेंबरमध्ये होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील खेळाडू यात सहभागी होणार आहेत.