
PV Sindhu Wedding: भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि होणारा नवरा व्यंकट दत्ता साई यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवासस्थानी भेट दिली आणि लग्नाचे आमंत्रण दिले. पीव्ही सिंधू व व्यंकट दत्ता साई यांचे लग्न २२ डिसेंबर रोजी उदयपुर येथे होणार आहे.
सचिन तेंडुलकरने पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने ट्वीट मध्ये लिहिले, "बॅडमिंटनमध्ये, स्कोअरची सुरुवात नेहमी 'प्रेमा'ने होते आणि व्यंकट दत्ता साईंसोबतचा तुमचा सुंदर प्रवास 'प्रेम' कायम राहील याची खात्री देतो. तुमच्या मोठ्या दिवसाचा एक भाग होण्यासाठी आम्हाला वैयक्तिकरित्या आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा दोघांनाही आयुष्यभराच्या आठवणी आणि आंनदी प्रवासासाठी शुभेच्छा!"