Rahul Dravid Son Fifty: भारताचे महान फलंदाज आणि प्रशिक्षक राहुल द्रविड त्यांचा मुलगा अन्वय याच्यासह विजया क्रिकेट क्लबमधून (मालूर) एकत्रित खेळले. बंगळूरमधील नासूर स्मृती लीग स्पर्धेत द्रविड पिता-पुत्र एकत्रित खेळण्याचा योग जुळून आला आहे. .राहुल द्रविड सहाव्या क्रमांकांवर फलंदाजीस आले त्यांनी आठ चेंडूत एका चौकारासह १० धावा काढल्या. तर त्यांचा मुलगा अन्वयने ६० चेंडूत आठ चौकारांसह ५८ धावांची खेळी केली. त्यांच्या विजया क्लबने यंग लायन्स क्लबविरुद्धच्या या सामन्यात सात बाद ३४५ धावा केल्या. अन्वय हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तर त्याचा मोठा भाऊ समित वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. द्रविड आयपीएलच्या तयारीसाठी त्यांच्या राजस्थान रॉयल्स संघासोबत गुवाहाटी येथे होते; परंतु दोन दिवसांपूर्वी ते बंगळूरमध्ये आले आहेत. .Virat Kohli एकाच पद्धतीने बाद होणे चिंताजनक, लेगस्पीनसमोर तंत्रात बदल करण्याची गरज; सुनिल गावस्करांचा सल्ला.कोणत्याही श्रेणीच्या सामन्यात पिता-पुत्र एकत्रित खेळण्याचा योग याअगोदरही जुळून आलेला आहे. डब्ल्यूजी ग्रेस आणि ग्लेस ज्युनियर, लाला अमरनाथ-सुरिंदर अमरनाथ, डेनिस लिली आणि ॲडम लिली, हिथ स्ट्रिक आणि डेनिस स्ट्रिक, शिवनारायण चंदरपॉल आणि तेगनारायण चंदरपॉल तसेच इयन बोथन आणि लियम बोथम हे वडील आणि मुलगा एकाच सामन्यातून खेळलेले आहेत..द्रविडच्या लेकाची दणदणीत कामगिरीसमित अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. तो सर्वात आधी चर्चेत आला ते १४ वर्षांखालील क्रिकेट गाजवताना. त्याने २०१६ मध्ये १२५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेतही १५० धावांची दमदार खेळी केली होती. त्याने २०१९ मध्येही १४ वर्षांखालील सामन्यात द्विशतकी खेळी केली होती..त्याची यानंतर कर्नाटकच्या १९ वर्षांखाली संघातही संधी मिळाली. त्याने यावर्षीच्या सुरुवातीला कुच बिहार ट्रॉफी २०२४ स्पर्धेतही कर्नाटकला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने या स्पर्धेत ८ सामन्यांमध्ये ३६२ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या होत्या..तो १९ वर्षांखालील नॅशनल चॅम्पियनशीपमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. त्याने आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेतही ४ सामन्यांत जवळपास १३० धावा ठोकल्या होत्या. पण पाठीच्या वेदनेमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती..IND vs PAK सामन्याची उत्कंठा शिगेला; टीम इंडियाला विजय मिळाल्यास उपांत्य फेरीचे तिकीट .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.