

Rajasthan Royals Head Coach Rahul Dravid Injury : आयपीएल (IPL25) सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. २२ मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू होणार आहे. सर्व फ्रॅंचायझींनी आपले प्रॅक्टीस कॅंप सुरू केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर दुबईतून परतलेले भारतीय खेळाडू आता आपल्या आयपीएल ताफ्यात सामील होत आहेत. सोशल मीडियाद्वारे वातावरण निर्मिती केली जात आहे. अशात रायजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला मोठा धक्का बसल्याचे समजत आहे. आरआरचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या पायाला दुखापत झाली आहे.