Ranji Trophy Final : मुंबई-विदर्भातील सामना ड्रॉ झाला तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या काय सांगतो नियम

Mumbai vs Vidarbha Final Ranji Trophy 2024 : वानखेडेवर खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचे दिसत आहे.
Ranji Trophy Final News in Marathi
Ranji Trophy Final News in Marathiेोकोत

Ranji Trophy Final News : वानखेडेवर खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचे दिसत आहे. मुंबईने विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने एकही विकेट न घेता 10 धावा केल्या होत्या. अथर्व तायडे 3 आणि ध्रुव शौर्य 7 धावा करून खेळत आहेत. अजून 2 दिवसांचा खेळ म्हणजे 180 षटके बाकी आहेत, त्यामुळे सामन्याचा निकाल निश्चित आहे.

Ranji Trophy Final News in Marathi
Virat Kohli : विराट कोहली T20 World Cup मधून बाहेर? धक्कादायक कारण आले समोर

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई 42व्यांदा रणजी विजेतेपद पटकावण्याच्या जवळ आहे. आणि सामना अनिर्णित राहिला तरी मुंबई संघ चॅम्पियन होईल. रणजी ट्रॉफीच्या नियमांनुसार सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात आघाडीवर असलेला संघ चॅम्पियन होतो. मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ 105 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली होती. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावा केल्या.

Ranji Trophy Final News in Marathi
Rohit Sharma : कुठे गेला रोहित शर्मा? मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये नाही तर.... फोटो होतोय व्हायरल

विदर्भ संघाने 539 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केल्यास तो इतिहास रचेल. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम रेल्वेच्या नावावर आहे. याच मोसमात त्याने त्रिपुराविरुद्ध 378 धावांचे लक्ष्य पार केले होते. यापूर्वी हा विक्रम सौराष्ट्राच्या नावावर होता. त्याने 2019-20 मध्ये 372 धावांचे लक्ष्य पार केले.

Ranji Trophy Final News in Marathi
Yashasvi Jaiswal : जलवा है हमारा...! यशस्वी जैस्वालच्या नावावर आणखी एक विक्रम; आता मिळाला ICC चा मोठा अवॉर्ड

रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग

  • 378/5 रेल्वे विरुद्ध त्रिपुरा – 2023-24

  • 372/4 सौराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश – 2019-20

  • 371/4 आसाम विरुद्ध सेवा – 2008-09

  • 360/4 राजस्थान विरुद्ध विदर्भ – 1989-90

  • 359/4 उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र – 2021-22

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com