
Vidarbha vs Kerala Ranji Trophy final 2025: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळने विदर्भाच्या ३७९ धावांचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काल आदित्य सरवटेने अर्धशतक ठोकले. तर, सचिन बेबीचेही शतक अवघ्या २ धावांनी हुकले, तो ९८ धावांवर बाद अन् केरळच्या सामन्यात आघाडी घेण्याच्या आशा मावळल्या. विदर्भाने केरळचा डाव ३४२ धावांवर गुंडाळला आणि पहिल्या डावाअंती सामन्यात अवघ्या ३७ धावांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर सामन्यात ३ विकेट्स घेणाऱ्या विदर्भाच्या हर्ष दुबेने आज विक्रम रचला.