
Rashid Khan raised voice against Medical Eduction banned For Womens: अफगाणिस्तान सरकारने महिलांना नर्सिंग आणि मिडवाइफरी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यावर बंदी घालण्याची योजना आखली आहे, असे एका अहवालानुसार समेर येत आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये व्यावसायिक वैद्यकीय आणि पॅरा-मेडिकल कर्मचाऱ्यांची आधीच कमतरता आहे, त्यामुळे बंदीनंतर आरोग्य सेवा प्रणालीसमोरील आव्हाने आणखी वाढतील, असे सांगितले जात आहे. सरकारच्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार राशिद खानने खंत व्यक्त केली आहे.