
Ravi Shastri On IND vs NZ Champions Trophy Final चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे पारडे किंचित जड असल्याचे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व सध्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी शनिवारी व्यक्त केले, मात्र न्यूझीलंडचा संघ चमकदार खेळ करीत आहे. भारतीय संघाला या स्पर्धेमध्ये एकच संघ पराभूत करू शकतो. तो संघ म्हणजे न्यूझीलंड. त्यामुळे न्यूझीलंड संघालाही कमी लेखता येणार नाही.