
बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू आहे. भारताने पहिल्या दोन दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये कर्णधार शुभमन गिल याने द्विशतकी खेळी करून धावांचा डोंगर उभा केला. भारताने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभा केला.