हेडिंग्ले, लीड्स : अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे संघातील अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्याने अखेर मी वरिष्ठ खेळाडू झालो आहे, अशी मजेदार सुरुवात करून रिषभ पंतने पत्रकारांच्या प्रश्नांविरुद्ध बॅटिंग सुरू केली. .उपकप्तानपदाची जबाबदारी मजेदार आहे. माझे आणि शुभमनचे मैदानाबाहेरही उत्तम जमते. त्या मैत्रीचा मैदानावर खेळताना चांगला उपयोग होतो. विराट आणि रोहितसारखे खेळाडू निवृत्त झाल्याने अनुभवाची कमतरता दिसत असली तरी नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे, याचा आनंदही होतो आहे, असे पंत म्हणाला..भारतात फलंदाजी करताना चेंडूकडे जाऊन फटकेबाजी केली जाते. इंग्लंडमध्ये खेळताना चेंडूची वाट बघायची असते, असा माझा अनुभव सांगतो. माझ्या सहकारी फलंदाजांना मी तेच सांगतो आहे. टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना तेव्हढे तंत्रशुद्धपणाचे महत्त्व नसते. इंग्लंडमध्ये चेंडू स्वींग होत असल्याने इथे खासकरून कसोटी खेळताना चांगले तंत्र कामाला येते, असे पंतने सांगितले..भारतात झालेल्या विमान अपघातानंतर दु:खाची छाया पसरली असताना पहिल्या कसोटी सामन्यात चांगला खेळ करून देशवासीयांना काही आनंदाचे क्षण हसण्याची संधी देता आली तर बरे वाटेल, असेही रिषभ पंतने सांगितले..IND vs ENG Test : लीड्समध्ये क्रिकेटचे वातावरण ‘तापू’ लागले; भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याची उत्सुकता वाढली.बरेच लोक बोलत आहेत की भारतीय फलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे; पण इंग्लंड संघातील गोलंदाजीतही ती कमतरता दिसते. ब्रॉड-अँडरसन नाहीत आता त्या संघात... किती बरे वाटते आहे, असे म्हणत रिषभ पंतने महान माजी गोलंदाजांना मानवंदना देताना इंग्लंडच्या पत्रकारांना सहजी हसत हसत कोपरखळी मारत पत्रकार परिषद संपवली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.