
Rishabh Pant Praised By Sachin Tendulkar : भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव तर स्वस्तात गुंडाळला, पण दुसऱ्याही डावात भारतीय फलंदाजी घरंघळली. जिथे मोठी खेळी करून भारताला सामन्यात मोठी आघाडी घ्यायची गरज होती, तिथे आगामी फलंदाजांनी मागोमाग विकेट्स टाकल्या. अशात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत भारताला सामन्यात शाबूत ठेवले. ऋषभच्या या तुफानी खेळीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कौतुक केले आहे.