
Indian Cricketers will Play Ranji Trophy : मागच्या दोन कसोटी मालिकेतील एकतर्फी पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटूंना दिग्गजांमार्फत देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम रंभीरनेही क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे केले. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटकडे वळले आहेत. ज्यूनियर क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल रणजी ट्रॉफी स्पर्धेचा पुढील सामना खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानंतर आता विकेटकीपक ऋषभ पंतही रणजी ट्रॉफी खेळणार आहे. पण वरिष्ठ क्रिकेटपटू रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा यांच्या देशांतर्गत खेळणार असल्याचे स्पष्ट झालेले नाही.