दुबई, ता. ५ : भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करीत चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत मजल मारली. या लढतीत विराट कोहलीने ८४ धावांची खेळी साकारत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या लढतीत विराट कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावरही विक्रमाची नोंद झाली. याच पार्श्वभूमीवर यावर टाकलेला प्रकाशझोत.