
Rohit Sharma Test Retirement: भारतीय संघ मेलबर्न येथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा सामना खेळत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेतील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील पिंक बॉल कसोटी सामना भारताला गमवावा लागला. गॅबा कसोटी सामनाही भारताच्या हातातून जाता जाता वाचला. शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि सामना ड्रॉ झाला.