
Rohit sharma video viral in IND vs NZ Champions Trophy match चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम साखळी सामना भारत व न्यूझीलंड दरम्यान रंगला आहे. नेहमीप्रमाणे रोहित नाणेफेक हरला आणि न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने हा सलग दहावा टॉस हरला. त्यानंतर रोहितला मैदानावर नाणेफेकीला उपस्थित असलेल्या माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने चिडवले. त्यानंतर रोहितने जी रिअॅक्शन दिली ती पाहून तुम्हाला हसू येईल. भारतीय कर्णधाराची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.