Rohit sharma Retirement: भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक पटकावल्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली या महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. कर्णधार रोहित शर्माने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे म्हणत सर्व शंकाकुशंकाना पूर्णविराम दिला. आता याच धर्तीवर भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर व ऑस्ट्रेलियाने महान कर्णधार रिकी पाँटिंग यांनी रोहित शर्मा खेळतच राहावा, असे म्हणत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.