IND vs ENG 5th Test Day 2 : दोन शतके, तीन अर्धशतके! भारताच्या शेपटानेही इंग्लंडला दमवले

IND vs ENG 5th Test Day 2
IND vs ENG 5th Test Day 2esakal

India Vs England 5th Test Day 2 : भारताने दमदार फलंदाजीनं अवघ्या 1 धावात 3 फलंदाज गमावले होते. इंग्लंड सामन्यात जोरदार पुनरागमन करणार असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने नवव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली.

भारताने दिवसअखेर 8 बाद 473 धावा केल्या असून 255 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून आजच्या दिवसात दोन शतके आणि दोन अर्धशतके झाली. रोहित शर्माने 103 तर शुभमन गिलने 110 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर सर्फराजने 56 आणि पदार्पण करणाऱ्या पडिक्कलने 65 धावा करत मोठी भागीदारी रचली.

IND vs ENG 5th Test Day 2
Ind vs Eng 5th Test Day 2 Live : दिवस अखेर भारताकडे भक्कम आघाडी, बुमराह-कुलदीपच्या जोडीने दमवले

भारताने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत इंग्लंडविरूद्ध मोठी आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे. रोहित शर्माने 103 तर शुभमन गिलने 110 धावांची शतकी खेळी केली असून सर्फराजने देखील आपले अर्धशतक पूर्ण केलं आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही विकेट न गमावता 135 धावा केल्या होत्या. रोहित आणि शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी रचली.

पहिल्या सत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीलाच भारताला पाठोपाठ दोन धक्के बसले. बेन स्टोक्सने रोहित शर्माला आणि मार्क वूडने शुभमन गिलला बाद केले.

मात्र पाठोपाठच्या दोन धक्क्यानंतर सर्फराज खानने सावध तर पडिक्कलने आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. या दोघांनी भारताला 350 पार पोहचवले आहे. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सर्फराजने 60 चेंडूत 56 धावा केल्या तर पडिक्कलने 103 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. पडिक्कलचे हे पदार्पणाच्या सामन्यातील अर्धशतक होते.

IND vs ENG 5th Test Day 2
Shubman Gill IND vs ENG : माझ्या मुलासाठी तिसरा क्रमांक योग्य नाही... गिलचे वडील निर्णयावर नाराज

मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव घसरला. दुसरा दिवस संपण्यासाठी काही षटके शिल्लक असतानाच जडेजा आणि जुरेल प्रत्येकी 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर अश्विनही शुन्यावर बाद झाला. भारताची अवस्था 4 बाद 427 पासून 8 बाद 428 अशी झाली.

अखेर भारताची ही पडझड कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी रोखली. या दोघांनी फक्त विकेट टिकवटून ठेवली नाही तर 45 धावांची भागीदारी रचत संघाला 473 धावांपर्यंत देखील पोहचवले. दिवसाच्या शेवटी भारताकडे 255 धावांची आघाडी झाली आहे. कुलदीप 27 तर बुमराह 19 धावा करून नाबाद आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com