

Rohit Sharma PC Champions Trophy 2025 : भारतीय संघ उद्या (गुरूवार) बांगलादेशविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळणार आहे. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात ४ वेगवान गोलंदाज व ५ फिरकीपटूंचा समावेश आहे. दुबईमधील पाटा खेळपट्टीवर फिरकीपटू घेऊन जाणे, हे भारतीय चाहत्यांना काहीसे न समजणारे होते. त्यामुळे संघ निवडीवर अनेक प्रश्न निर्माण उपस्थित करण्यात आले होते. पण आज सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने 'आमच्याकडे ५ फिरकीपटू नाहीत' म्हणत या प्रश्नांचे उत्तर दिले आहे.