Rohit Sharma Watch Collection : पत्रकार परिषदेत रोहितच्या 2 कोटी रूपयांच्या घड्याळाचीच चर्चा

Rohit Sharma
Rohit Sharma Watch Collectionesakal

Rohit Sharma Watch Collection : भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे असलेल्या गांड्यांच्या कलेक्शनबाबत आपल्याला सर्वांना माहिती आहे. मात्र रोहित शर्माला महागड्या घडाळ्यांचे कलेक्शन करण्याची देखील आवड आहे. नुकतेच वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली.

त्या संदर्भात मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात रोहित शर्मा आणि अजित आगरकरने एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला रोहित शर्मा एक महागडं घड्याळ घालून आला होता. या घड्याळाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Rohit Sharma
T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

रोहित शर्माने स्वित्झर्लंडमधील पटेक फिलिप या जुन्या आणि महागडी घड्याळं तयार करणाऱ्या कंपनीचं घड्याळ घातलं होतं. त्यानं Patek Philippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ घातलं होतं. याची किंमत जवळपास 2.17 कोटी रूपये इतकी आहे.

पटेक फिलिप Nautilus Platinum 5711 हे घड्याळ 2022 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. हे घड्याळ व्हाईट गोल्डपासू तयार करण्यात आलं आहे. त्याची डाईल ही निळ्या रंगाची असून काळ्या रंगाचे ग्रेडेशन आणि 41 एमएमची स्लिक केस आहे. हे घड्याळ जरी जुन्या धाटणीचं असलं तरी तांत्रिकदृष्ट्या अॅडव्हान्स आहे. घडाळ घालणाऱ्याच्या हालचालीमुळे या घड्याळाला उर्जा मिळते. तसेच हे घड्याळ 120 मीटर पर्यंत वॉटर रेजिस्टंट आहे.

हे घड्याळ ज्यावेळी लाँच झालं त्यावेळी त्यांची किंमत ही 69,785 डॉलर इतकी होती. मात्र आता याची किंमत ही 2,58,888 डॉलर म्हणजे 2.17 कोटी रूपये इतकी झाली आहे.

Rohit Sharma
IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

रोहित शर्माचे वॉच कलेक्शन

रोहित शर्मा हा महागडी घड्याळं घालून वावरताना कायम दिसत असतो. त्याच्याकडे रोलेक्स, ह्युब्लॉट, मेस्ट्रो या कंपन्यांच्या घड्याळ्यांचे कलेक्शन आहे. रोहित शर्माकडे एकूण जवळपास 30 ते 35 कोटी रूपयांची घड्याळं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com