
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात नुकतीच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. स्पर्धेनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेईल अशी अफवा पसरवली जात होती. पण रोहितने फायनल जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत मी कुठेही जाणार नाही म्हणत निवृत्तीच्या चर्चांना ब्रेक लावला. त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी आधी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान रोहित कसोटीतून निवृत्ती घेईल अशा बातम्या समोर येत होत्या, पण तेव्हाही रोहितने निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. रोहित आता पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद सायकलमध्ये खेळणार आहे आणि स्पर्धेतील पहिली इंग्लंडविरूद्ध मालिका खेळण्यासाठी कर्णधार सज्ज असल्याचेही समजत आहे.