Sachin Tendulkar: सचिनला कोणत्या टेनिसपटूबरोबर करायचीये बॅटिंग, स्वत:च केलाय खुलासा; पाहा Video

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने कोणत्या टेनिसपटूबरोबर क्रिकेट खेळायला आवडेल आणि कोणत्या खेळाडूंबरोबर टेनिस खेळायला आवडेल, याचा खुलासा केला आहे.
Sachin Tendulkar - Roger Federer
Sachin Tendulkar - Roger FedererX/Wimbledon

Sachin Tendulkar at Wimbledon: सचिन तेंडूलकर सध्या इंग्लंडमध्ये असून ते विम्बलडन टेनिस स्पर्धेचा आनंद घेत आहे. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळख असणारा सचिन तेंडुलकर जेव्हा विम्बलडन कोर्टवर पोहोचला तेव्हा त्याचं टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलं गेलं.

यादरम्यान सचिनने टेनिस खेळायचे असल्यास कोणासोबत खेळायला आवडेल, आणि कोणत्या खेळाडूसोबत खेळू इच्छितात हेही सांगितले.

Sachin Tendulkar - Roger Federer
Sachin Tendulkar : मित्रा वर्तुळ पूर्ण झालं...! वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रिकेटच्या देवाचा राहुल द्रविडसाठी भावूक मेसेज

विम्बलडनच्या अधिकृत अकाऊंटवर सचिनचा व्हिडीओ शेअर केला गेला. या व्हिडीओमध्ये त्यांना खूप मजेशीर प्रश्न विचारले आहेत. कोणत्या टेनिस खेळाडूबरोबर फलंदाजी करायला आवडेल? असे विचारल्यावर सचिनने रॉजर फेडररचं नाव घेतलं.

सचिन म्हणाला, फेडररचं क्रिकेटशीसुद्धा संबंध आहे. त्याची आई दक्षिण आफ्रिकामधून आहे आणि ते दोघेही क्रिकेट फॉलो करतात. जेव्हा पण मी त्यांच्यासोबत बोलायचो ते टेनिस व्यतिरिक्त क्रिकेटविषयी खूप गप्पा मारायचे.

Sachin Tendulkar - Roger Federer
Sachin Tendulkar : क्रिकेटचा तू खरा चॅम्पियन... मास्टर ब्लास्टरने रोहित अन् विराटसाठी केली भावनिक पोस्ट

कोणत्या खेळाडूसोबत ते टेनिस खेळु इच्छितात? ह्या प्रश्नावर सचिनने सांगितले की, अशी दोन नावे आहेत ज्यांच्यासोबत खेळायला आवडेल, एक म्हणजे शेन वॉर्न जो दुर्दैवानं आता आपल्यामध्ये नाही आणि दुसरे म्हणजे युवराज सिंह.

सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त अन्य काही भारतीय खेळाडू आणि बॉलिवूड सेलेब्रेटी देखील सध्या लंडनमध्ये आहेत. यामध्ये क्रिकेटर विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com