
पुणे : राज्यभरातील टेनिस बॉल क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि तब्बल एक कोटींहून अधिक रुपयांची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध होणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे जगातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.