
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकदमच निष्प्रभ ठरलेल्या भारतीय गोलंदाजीत बदल करण्याची गरज असून, शार्दुल ठाकूरला वगळून त्याच्या ठिकाणी चायनामन कुलदीप यादवची निवड करावी, असे स्पष्ट मत माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.