
Sayali Satghare Debut in Team India : मुंबईकर सायली सातघरेने आज भारतीय संघात पदार्पण केले. आयर्लंड विरूद्धच्या वन-डे मालिकेसाोठी सायलीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कर्णधार स्मृती मानधनाकडून तिने आज आपली मेडन कॅप स्वीकारली. यावेळी सायलीचे कुटुंबीयही उपस्थित होते. अष्टपैलू-वेगवान गोलंदाज मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. त्याचबरोबर तिने गुजरात टायटन्स संघातून वूमेन्स प्रिमिअर लीगमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर सायलीला भारतीय संघात संधी मिळाली आहे.