West Indies vs Australia: पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला;ऑस्ट्रेलियाच्या २२५ धावा, सील्स, जोसेफ, ग्रीव्ह्स प्रभावी
Kingston Test: वेस्ट इंडीजच्या वेगवान त्रिकुटाने किंगस्टनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या २२५ धावांत गुंडाळला. पहिल्या दिवसअखेरीस यजमानांनी एक बाद १६ धावा करून सामन्यावर पकड मिळवली.
किंगस्टन : वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये किंगस्टन येथे दिवस-रात्र (डेनाइट) कसोटी सामना सुरू आहे. दोन देशांमधील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली.