
Shakib Al Hasan Ban Lifted: बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनसाठी मागील वर्ष अडचणींनी ग्रासलेले होते. बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणादरम्यान एका हत्येचा आरोपाखाली शाकिबवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शाकिब कुटुंबासह इंग्लंडमध्ये स्थायिक झाला अन् इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर अनधिकृत बॉलिंग अॅक्शनमुळे बंदी घातली होती. पण बांगलादेशच्या माजी कर्णधारासाठी आनंदाची बातमी आहे, त्याच्यावरील बंदी आता हटवण्यात आली आहे.