
Shakib Al Hasan and Tamim Iqbal available for Champions Trophy 2025: बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन व तमीम इक्बाल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार असल्याचे समजत आहे. दोन्हीही खेळाडू बांगलादेश क्रिकेटपासून सध्या अलिप्त झाले आहेत. तमीम इक्बालने सप्टेंबर २०२३ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध आपला शेवटचा वन-डे सामना खेळला होता. तर शाकिब अल हसन मागच्या काही महीन्यांपासून देश सोडून यूएसएमध्ये स्थायिक झाला आहे. दोघेही मागच्या वर्षभरापासून चर्चेत राहिले आहेत.