
Shoaib Malik and Shoaib Akhtar Reaction After Pakistan Loose Match: भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आपल्याला जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. कालच्या सामन्याचा पाकिस्तानचा एकतर्फी पराभव झाल्यानंतरही आपल्याला अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पाकिस्तान संघांवर पाकिस्तानी चाहतेच बरसताना पाहायला मिळत आहेत. अशात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक हिंदी चित्रपटातील दु:खी गाणी गाताना पाहायला मिळाला. तर शोएब अख्तरने पाकिस्तानी पाकिस्तानी मॅनेजमेंटला बेअक्कल म्हणत सुनावले.