
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार शुभमन गिल व या संघातील इतर खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले की, गिल याने इंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटींत धावांचा पाऊस पाडत त्याच्यामधील अफाट गुणवत्तेची झलक दाखवून दिली आहे.