

दुबई, ता. २४ (पीटीआय) ः फटक्यांमधील विविधता, कमालीची शैली आणि संयम असा परिपूर्ण खेळ असलेला शुभमन गिल भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार असेल, असे भाकीत माजी खेळाडू संजय बांगर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी वर्तवले आहे.सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी गिलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिलने ४६ धावांची शानदार खेळी साकार केली होती. त्याअगोदर बांगलादेशविरुद्ध निर्णायक शतक झळकावले होते.